सर्व धर्मीय महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या रेहाना सारवान
पुणे प्रतिनिधी (दि.२५ जानेवारी):-मकर संक्रांतीनिमित्त सामाजिक कार्यकर्त्या रेहाना सारवान यांनी महिलांमध्ये एकजूटता निर्माण होण्यासाठी सर्व धर्मीय महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मज्जिद गल्ली येरवडा पुणे ६ येथे सोमवार दि.३० जानेवारी रोजी सायं ६.०० वा.आयोजित केला आहे.या माध्यमातून सर्व जाती धर्मातील महिलांना एकत्र आणण्याचे काम करण्यात येणार असल्याचे तसेच हळदी-कुंकू कार्यक्रमात एकवटलेल्या सर्व जाती-धर्माच्या महिलांनी महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीचा नारा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे,तरी परिसरातील सर्व महिलांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या रेहाना सारवान यांनी केले आहे.