नगर प्रतिनिधी (दि.२५ जानेवारी):-दि.१४/१२/२०२२ रोजी फिर्यादी सत्यवान बालकिसन पठारे (रा.मुपो पाचुंदा ता.नेवासा,जि.अहमदनगर) यांची हिरो स्पेलंडर आयस्मार्ट कंपनीची मोटारसायकल नं एमएच १७ बीजे ९५०५ ही जिल्हापरिषद गेट समोरुन, माळीवाडा,अहमदनगर येथुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे संमती शिवाय लबाडीच्या इरादयाने चोरुन नेली आहे.वगैरे मा च्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं १०१४/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलीस निरिक्षक/ श्री.संपतराव शिंदे यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,सदर गुन्हयातील आरोपी हा चोरीस गेलेल्या मोटारसायकलसह अमरधाम जवळील गरुडाजवळ सदर चोरीतील मोटारसायकल विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोसई मनोज कचरे यांना कारवाई करण्याचा आदेश देवुन पोसई/कचरे यांनी सदर ठिकाणी पथकासह जावुन सापळा लावुन आरोपीला हिरो स्पेलंडर आयस्मार्ट कंपनीची मोटारसायकल नं एमएच १७ बीजे ९५०५ या मोटारसायकलसह ताब्यात घेतले.त्यास त्याचे नाव गांव विचारता त्याने त्याचे राकेश संजय खारगे (वय-२३ वर्षे रा.अगस्त कॉलनी आलमगीर भिंगार अहमदनगर)असे असल्याचे सांगीतले.त्यास मोटारसायकल बाबत विचारपुस करता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तर दिली त्यास अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने सदर मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/संपतराव शिंदे,गुन्हे शोध पथकाचे पोसई/मनोज कचरे,पोहेकॉ/गणेश धोत्रे,पोना/योगेश भिंगारदिवे,पोना/ए.पी इनामदार,पोना/योगेश खामकर,पोकॉ/सुजय हिवाळे,पोकॉ/सोमनाथ राउत,पोकॉ/संदीप थोरात, पोकॉ/अमोल गाढे,पोकॉ/कैलास शिरसाठ आदिंच्या पथकाने केली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोना/नितीन शिंदे हे करीत