नगरच्या गिर्यारोहकांनी ४५० फूट उंचीचा वानरलिंगी सुळका केला सर
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२५ जानेवारी):-महाराष्ट्रातील वानरलिंगी सुळका भल्या भल्या गिर्यारोहकांना आवाहन देणारा कडा आहे.सुमारे ४५० फूट उंच असलेला हा सुळका सरळ ९० अंश कोनात ताठ मानेने उभा आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नानेघाटात वसलेला अतिशय अवघड असा, सुमारे ४५० फूट उंच असलेला वानरलिंगी सुळका या सुळक्याची गणना गिर्यारोहण क्षेत्रात अतिकठीण श्रेणीत केली जाते. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून तीन तासांची अतिशय दमछाक करावी लागते.नगर येथील गिर्यारोहक विशाल अंबादास सोनवणे,विश्वजित रोकडे, व राहुरी येथील मनिषा काकडे आणि याच्यासोबत बाल गिर्यारोहक हरिओम काकडे वय १२ वर्ष यांनी हा सुळका व्हॅली क्रॉसिंग करून सर केला.त्यांच्या टेकनिकल टीम ने (माऊं टेनियर लहू पुणे ) यांनी आदल्या दिवशीच जीवधन किल्ला ते वानरलींगी सुळक्याच्या सेटअप करून ठेवला होता.वानरलींगी व्हॅली क्रॉसिंग करण्यासाठी पूर्णपणे तांत्रिक साहित्यावर अवलंबून राहावे लागते.आतापर्यंत यांनी लिंगाना किल्ला,मोरोशीचा भैरवगड,ढाक बहिरी आणि खडतर असा वजीर सुळका सर केला असून महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवर यशस्वीरित्या गिर्यारोहण केले आहे.येथे चढाई करतांना नेहमीच रॉक क्लाइंबिंग उपकरणांचा संपूर्ण संच सोबत ठेवावा लागतो. नगरकरांसाठी ही अभिमानास्पद बाब असून लवकरच या गिर्यारोहकांचा नगर शहराच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे.