Maharashtra247

देवळी शहरातून शिक्षण घेऊन उच्च पदावर रुजू झालेल्या भूमिपुत्रांचा क्रांतिवीर महादेवराव ठाकरे प्रतिष्ठानच्या वतीने होणार सन्मान 

 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी(सागर झोरे):-सध्या स्पर्धेचे युग असून विद्यार्थ्यांच्या जीवनातील ११ वी आणि १२ वी चे वर्ष शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे मानले जाते. सर्वत्र विद्यार्थी व पालक भविष्याच्या चिंतेने करिअर निवडीसाठी धडपडतात.यात मात्र ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासबंधी अनेक सुविधा उपलब्ध असतात.विशेषतः देवळी सारख्या छोट्याश्या गावातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता करिअर बाबत योग्य मार्गदर्शन,करिअरसाठी असलेले अनेक पर्याय,विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कला गुण,आवड,छंद यातून उत्तम करिअर करता येते.प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थी भविष्य घडवू शकतात हे सांगण्यासाठी देवळी शहरातील विद्यार्थी ज्यांनी देवळीत शिक्षण घेऊन आज वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदावर रुजू झाली आहे.त्या व्यक्तींना ‘सन्मान मायभूमितील भूमीपुत्रांचा’ या सन्मान सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर एकाच मंचावर येणार आहे.सोबतच विद्यार्थ्यांकरिता ‘दिशा शोध नव्या क्षितिजांचा’ या करिअर मार्गदशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी,करिअर बाबत जागरूकता व्हावी, त्याचे आत्मबल वाढावे या सामाजिक जाणिवेतून क्रांतिवीर महादेवराव ठाकरे प्रतिष्ठान ने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शन कराळे सर करणार असून डॉ.सचिन पावडे,अविनाश काकडे,श्री फटींग सर, अँड महेश टावरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.दि. २८ जानेवारीला देवळी येथे स्थानिक भोंग सभागृहात दुपारी १२ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ वी व १२ वीतील विज्ञान,कला,वाणिज्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन क्रांतिवीर महादेवराव ठाकरे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page