अहिल्यानगर (दि.6 प्रतिनिधी):- अहिल्यानगर शहरातील मार्केटयार्ड चौकातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा अनावरण समारंभासाठी शुक्रवार दि.7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.वा. हॉटेल राजयोग येथे बैठक आयोजित केली आहे.
तरी आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटना प्रमुख व कार्यकर्ते सर्व मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते सर्व अधिकारी वर्ग धम्म बांधव भीमसैनिक यांनी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीने केले आहे. आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते सर्व संघटना पदाधिकारी यांना कळविण्यात येते की अहिल्यानगर शहरात आपल्या सर्वांच्या योगदानातून संघर्षातून आंदोलनातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा होत आहे त्याचा आपल्या सर्वांना आनंद आणि उत्सुकता आहे.अनावरण समारंभ आयोजित करण्यासाठी आपल्या सर्व आंबेडकरी समाज बांधव व सर्व संघटना प्रमुख कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे.