अहिल्यानगर (दि.9 प्रतिनिधी):- अहिल्यानगर शहरामध्ये मी इकडचा डॉन आहे,असे म्हणत कल्याण येथील फळांच्या व्यापार्यास नगरमध्ये मारहाण करून महिन्याला पाच हजार रूपये देण्याची मागणी करण्याची घटना घडली आहे.
पंकजकुमार मुरलीप्रसाद वर्मा (वय 29, रा. लक्ष्मी मार्केट,कल्याण) असे मारहाण झालेल्या व्यापार्याचे नाव आहे ही घटना 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता बागवान यांच्या गाळ्यासमोर फळमार्केट,मार्केटयार्ड येथे घडली.याप्रकरणी वर्मा यांच्या फिर्यादीवरून सॅम उर्फ समीर शेख व इतर दोन अनोळखी इसम (रा.नगर) यांच्या विरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्मा यांनी फिर्यादीत म्हटले आहे कि,बागवान यांच्या फळांच्या गाळ्यासमोर असताना आरोपी त्यांच्या जवळ आले. सॅम उर्फ समीर शेख हा त्यांना म्हणाला की,मुझे अभी पता चला है की, तु यहाँ पर आकर व्यापार करता है.तुझे यहाँ आकर व्यापार करना है तो मुझे पाच हजार रूपये महिना देना पडेगा. तु मुझे जानता नाही है, मै इधर का डॉन हू असे म्हणून शिवीगाळ केली.शेख व त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी वर्मा यांना मारहाण केली. याप्रकरणी वर्मा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड करीत आहेत.