अहिल्यानगर (दि.2 मार्च 2025):- तपोवन रस्ता परिसरातून गेल्या शनिवारी ता. 22 फेब्रुवारी रोजी एका युवकाला एमआयडीसी परिसरातील एकतारी डोंगरात जाळून टाकून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. वैभव शिवाजी नायकोडी (वय 19 राहणार ढवणवस्ती तपोवन रोड सावेडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
तपोवन रस्त्यावरील सलूनच्या दुकानाजवळ चार चाकी मोटरतून आलेल्या चौघांनी वैभव नायकवडी याचे अपहरण करून पळून नेले होते. ही घटना 22 फेब्रुवारी 2025 रोजी घडली होती.याबाबत मृताची आई सीमा शिवाजी नायकोडी (रा.ढवण वस्ती सावेडी) यांनी 27 फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली होती.
फिर्याद दाखल होतास तोफखाना पोलिसांनी यातील चार जणांना अटक केले होते. अनिकेत उर्फ लपका विजय सोमवंशी, सुमित बाळासाहेब थोरात,महेश मारुतीराव पाटील,नितीन उर्फ निशिकांत अशोक ननवरे (रा. नवनागापूर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.