अहिल्यानगर (प्रतिनिधी):- कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचींग करणाऱ्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. अभिमन्यू विलास कुसळकर (रा.नेवासा जि.अहिल्यानगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत दोन दिवसापूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी चैन स्नॅचींग करणारे आरोपी होंडा शाईन दुचाकी वरून स्टेशन रोड परिसरात फिरत आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री.अमोल भारती यांना मिळाली होती.मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाला याची माहिती देऊन कारवाई करण्यास सांगितले होते.
पोलीस तपास करत असताना अभिमन्यू कुसळकर यास पोलिसांनी पकडले असता त्याने पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली.त्याच्या कडून सोन्याच्या मुद्दमालासह एक दुचाकीसह 2 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे,मपोहेकॉ/ रोहिणी दरंदले,विक्रम वाघमारे, सूर्यकांत डाके,विशाल दळवी, संदीप पितळे,दीपक रोहकले, तानाजी पवार,सुरज कदम, सचिन लोळगे,दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे,संकेत धिवर,राम हंडाळ,दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ.राहुल गुंडू व नितीन शिंदे यांनी केली आहे.