अहिल्यानगर (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील जामखेड शहरामध्ये रात्री दरोडा घालणाऱ्या टोळीतील 7 आरोपीना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे धाराशीव येथील आरोपीकडून 17 लाख 45,000/- रू किं.मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.26/02/2025 रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी प्रतीक्षा शंकर रोकडे (रा.साकत फाटा,जामखेड, जि.अहिल्यानगर) या त्यांचे कुटूंबियासह घरी असताना एका महिलेने “दिदी दरवाजा खोलो” असा आवाज दिला.फिर्यादीने घराचा दरवाजा उघडला त्यावेळी अज्ञात 7 ते 8 आरोपी हे तोंडाला रूमाल बांधुन चाकु सारखे हत्यार घेऊन घरात येऊन त्यांनी चाकुचा धाक दाखवून फिर्यादी, तिची बहीण व आई यांचे अंगावरील सोन्याचे दागीने व घरातील पैसे जबरीने चोरून नेले.याबाबत जामखेड पोलीस ठाणे येथे गु.र.नं.72/2025 बीएनएस कलम 310 (2) प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दरोडयाच्या गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्हयाचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव,अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे,बापुसाहेब फोलाणे,संतोष लोढे,ज्ञानेश्वर शिंदे,हृदय घोडके,आण्णासाहेब दातीर,विश्वास बेरड,संदीप दरंदले,सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे,अशोक लिपणे,विजय ठोंबरे,भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,जालींदर माने,रोहित येमुल,आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ,रोहित मिसाळ,भगवान थोरात,अमृत आढाव,विशाल तनपुरे,मनोज लातुरकर,सुनिल मालणकर, फुरकान शेख,प्रशांत राठोड, ज्योती शिंदे,उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर व महादेव भांड अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
पथक वर नमूद गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा बाबा आबा काळे, रा.लक्ष्मीपेढी, तेरखेडा,ता.वाशी,जि.धाराशिव याने त्याचे साथीदारासह केला असून ते गुन्हा करण्याकरीता पुन्हा पांढरे रंगाचे इरटिका व काळया रंगाचे स्कार्पिओ गाडीने जामखेड येथे येणार आहेत.तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून जामखेड ते खर्डा जाणारे रोडवर, मारूती मंदिराजवळ जामखेड येथे सापळा लावून थांबलेले असताना एक पांढरे रंगाचे इरटिगा व काळे रंगाची स्कॉर्पिओ गाडी खर्डाकडून जामखेडच्या दिशेने येत असल्याने संशयित वाहनांना थांबविले.त्यावेळी स्कॉर्पिओ गाडीमधील इसम गाडीचा दरवाजा उघडून पळू लागले.त्यावेळी पथकातील अंमलदारांनी पळून जाणाऱ्या इसमांचा पाठलाग करून तीन इसम पकडले असून दोन इसम पळून गेले.पथकाने पाठलाग करून पकडलेल्या तीन इसमांना व इरटिका गाडीतील इसमांना पोलीस पथकाची व पंचाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव इरटिका गाडीमधील 1) अनिल मच्छिंद्र पवार, वय 32 2) सुनिल धनाजी पवार, वय 19 3) संतोष शिवाजी पवार, वय 22 अ.क्र.1 ते 3 रा.लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता.वाशी, जि.धाराशिव 4) रमेश मत्या काळे, वय 47, रा.म्हसा खांडेश्वरी, ता.कळंब, जि.धाराशीव व स्कॉर्पिओ गाडीमधील 5) बाबा आबा काळे, वय 25 6) अमोल सर्जेराव काळे, वय 23 अ.क्र.5 व 6 रा.लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता.वाशी जि.धाराशीव 7) शिव अप्पा पवार, वय 24, रा.बावी, ता.वाशी, जि.धाराशीव असे असल्याचे सांगीतले. त्यांचेकडे पळून गेलेल्या इसमांचे नाव विचारले असता त्यांनी 8) कुक्या बादल काळे, रा.मोहा, ता.कळंब, जि.धाराशीव (फरार) 9) सचिन काळे पुर्ण नाव माहित नाही रा.जामखेड, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगीतले.ताब्यातील आरोपीतांना पथकाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपी बाबा आबा काळे याने वर नमूद आरोपी व 10) महिला शालन अनिल पवार, रा.तेरखेडा, ता.वाशी, जि.धाराशीव (फरार) अशांनी मिळून इरटिगा व स्कॉर्पिओ वाहनामधुन 3 ते 4 दिवसापुर्वी जामखेड येथे रात्रीचे वेळी सचिन काळे याचे सांगणेवरून त्याने दाखविलेल्या एका घराचा दरवाजा वाजवून शालन पवार हिने दिदी दरवाजा खोलो असे बोलून दरवाजा उघडल्यानंतर चाकुचा धाक दाखवून सोन्याचे दागीने, रोख रक्कम व मोबाईल चोरल्याची माहिती सांगीतली.
पंचासमक्ष आरोपीतांची अंगझडती घेऊन त्यांचेकडून 6,00,000/- रू किं.त्यात मारूती सुझुकी कंपनीची इरटिगा गाडी क्र.एमएच-05-सीएम-7644, 7,00,000/- रू किं.त्यात महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ गाडी क्र.एमएच-02-सीव्ही-5858, 45,000/- रू किं.त्यात 4 मोबाईल असा एकुण 13,45,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडे गुन्हयातील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता बाबा आबा काळे याने सांगीतले की, गुन्हयातील काही दागीने शालन अनिल पवार व अनिल मच्छिंद्र पवार यांनी विकले व काही दागीने हे कुक्या बादल काळे व सचिन काळे यांचेकडे आहेत.ताब्यातील आरोपी अनिल मच्छिंद्र पवार याचेकडे सोन्याचे दागीन्याबाबत विचारपूस करता त्याने त्याचेकडील दागीने हे तेरखेडा, ता.वाशी, जि.धाराशीव येथील सोनारास विकल्याची माहिती सांगीतल्याने सदर सोनाराकडून 4,00,000/- रू किंमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आलेली आहे.ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी जामखेड पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदर कारवाई श्री.राकेश ओल पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक व श्री.विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.