बंधन लॉन्स येथे संगीतमय साई चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी ॲड.धनंजय जाधव यांचे अवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार आणि ॲड.धनंजय जाधव मित्र मंडळाच्या वतीने आपल्या नगर शहरात प्रथमच हभप समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून संगीतमय साई चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रमुख संयोजक ॲड. धनंजय जाधव यांनी दिली. बुधवार दि.20 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या कथा सोहळ्याचे उद्घाटन होणार असून तसेच येत्या 26 ऑगस्टला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कथेचा समारोप सोहळा होणार आहे.

माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कथा सोहळा नगर मनमाड रोडवरील बंधन लॉन येथे होत आहे.दररोज रात्री सहा ते नऊ या वेळेत ही कथा सांगितली जाणार आहे.हभप समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून संगीतमय साई चरित्र ऐकायला मिळणे ही नगरकरांसाठी एक सुवर्णसंधी आहे नगर शहरात अशा संगीतमय भक्ती सोहळा प्रथमच होत आहे त्यात सर्व नगरकरांनी सहभागी व्हावे अखेरच्या दिवशी सामुदायिक महाप्रसाद असेल यामध्ये भाविकांनी आपले योगदान देऊन सहभागी व्हावी असे आवाहन ॲड.धनंजय जाधव यांनी केले आहे.