संगमनेर प्रतिनिधी (दत्तात्रय घोलप):- संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र काकडवाडी येथील जागृत देवस्थान धुळे महालक्ष्मी माता काकडवाडी मंदिर याठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास जबरी चोरीची घटना घडली आहे.काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी महालक्ष्मी मंदिर येथील देवीचा ५१ तोळ्यांचा मुकुट तसेच अडीच किलो चांदीच्या वस्तू इतरही मौल्यवान वस्तू चोरट्यांनी चोरून नेत पोबारा केला आहे.
तर मंदीर परिसरामध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेरेच्या DVR देखील चोरट्याने चोरून नेला आहे.घटनास्थळी संगमनेर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,संगमनेर ग्रामीण पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे,पोलीस उपनिरीक्षक सातपुते,पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ यांनी भेट दिली.यां ठिकाणी तपासकामी ठसा तज्ञ व शवान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
सदर घटनेचा लवकरात लवकर शोध लावावा अशी मागणी काकडवाडी गावाचे माजी सरपंच जनार्दन कासार यांनी केली आहे.तसेच सदर घटने विषयी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी अधिक माहिती दिली.सदर घटनेचा अधिक तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.