अहिल्यानगर (प्रतिनिधी):- धारदार तलवार बाळगणाऱ्या एकास भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडून त्याच्या ताब्यातून एक धारदार तलवार जप्त केली आहे. हि कारवाई 8 मार्च रोजी भुईकोट किल्ल्याजवळ नगर क्लबकडे जाणाऱ्या रोडवर कॅम्प पोलिसांनी केली आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार दीपक शिंदे यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार शिंदे यांनी लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ तपास पथकातील अंमलदार यांना नमूद ठिकाणी जाऊन सापळा रचून कारवाई करण्यास सांगितले.पोलीस पथक हे मिळालेल्या माहितीनुसार नमूद ठिकाणी सापळा रचून थांबले असताना एक इसम नगर क्लब कडे पायी येताना दिसला त्याच पोलीस आल्याची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास पथकाने जागीच पकडून पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला लावलेली धारदार तलवार मिळून आल्याने त्यास विश्वासात घेऊन तलवार कशासाठी आणली आहे असे विचारले असता त्यांनी उत्तरे देऊन त्याने त्याचे नाव फुरकान अन्वर कुरेशी राहणार नागरदेवळे फाटा तालुका जिल्हा अहमदनगर असे सांगितले. सदर इसमे विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 111/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर,पोलीस अमलदार कैलास सोनार,दीपक शिंदे विलास गारुडकर,रवी टकले, पांडुरंग बारगजे,अंकुश कासार,, कैलास शिरसाट,समीर शेख यांनी केली आहे.