अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शेतीच्या नावाखाली अफुची (खसखस) लागवड करणा-या इसमावर नगर तालुका पोलीसांनी कारवाई करत मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दि.8 मार्च रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते हे पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या बातमीनुसार सारोळा कासार गावचे शिवारात इसम नामे-अशोक आसाराम शिर्के (रा. सारोळा कासारा ता.जि. अहिल्यानगर) यांचे शेत गट नं 317/4 मध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेली अफुची (खसखस) लावलेली आहे.सदर बातमीची खात्री केली असता सदर बातमीतील हकीकत वरिष्ठांना कळवुन कायदेशीर कारवाई करण्याची परवानगी घेवून दोन सरकारी पंच, वजनकाटा धारक व पोलीस स्टाफ अशांनी सदर ठिकाणी जावुन छापा टाकला असता दरेमळा,सारोळा कासार शिवार ता.जि. अहिल्यानगर येथील शेत गट क्र-317/4 मधील रहिवासी नामे अशोक आसाराम शिर्के रा. सारोळा कासारा ता.जि. अहिल्यानगर यांचे शेतात अफुची (खसखस) बोंडे असलेली झाडे दिसुन आल्याने तसेच तेथे हजर असलेले इसम यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक आसाराम शिर्के रा. सारोळा कासारा ता.जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगुन सदरची शेती माझीच आहे असे सांगुन त्यास पोलीसांची व पंचांची ओळख सांगुन अंगझडती देवुन व घेवुन छाप्याचा उद्देश कळविला.
सदर ठिकाणी 4 लाख 27,500/-रु किं.ची अफूची (खसखस) ची 4275 झाडे एकुण 50 किलो 300 ग्रॅम वजनाची ओली लहान मोठे झाडे त्यास बोंडे असलेली व काही झाडे ही वाळलेल्या स्थितीत प्रतेकी 100 रु प्रती झाडा प्रमाणे मिळुन आल्याने सदरची झाडे उपटुन ती पंचांसमक्ष जप्त करुन आरोपी व मुद्देमाल अशांना पोलीस स्टेशनला आणुन आरोपी विरुद्ध पोहेकाँ/2178 राहुन राजेंद्र द्वारके यांनी सरकारतर्फे फिर्याद होवुन 11-139-2025- गुंगीकारक द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (ब), 18 प्रमाणे फिर्याद दिलेली आहे.सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली नगर तालुका सहा.पोलिस निरीक्षक श्री. प्रल्हाद गिते,पोसई/जयेश गांगुर्डे, पोहेकाँ/राहुल द्वारके,पोहेकाँ/शिवाजी खरात,मपोना/मनिषा काळे,पोकॉ/रमेश शिंदे,पोकाँ/विक्रांत भालसिंग,चासफौ/दिनकर घोरपडे,चापोकाँ/विकास शिंदे सर्व यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पो. उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करीत आहेत.