अहिल्यानगर (प्रतिनिधी):-ऑमलेट-पावची हातगाडी चोरी करणाऱ्या आरोपींचा तपास करत कोतवाली पोलीसांनी जेरबंद केले आहे.दि.६ मार्च २०२५ रोजी फिर्यादी नामे आलीम जाफर शेख (रा. बुरुडगांव रोड. अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की,माळीवाडा बसस्थानक उज्वल कॉम्पलेक्स समोर आम्लेट पावगाडी चालवतो दि.४ मार्च रोजी अतिक्रमण काढले असलेने सदर गाडी इंम्पेरिअल चौक येथे बॉम्बे चिकन समोर लावली असताना तेथुन ती अज्ञात चोरटयांनी चोरुन नेली आहे.यां फिर्यादीवरुन कोतवाली पोस्टे येथे गुन्हा रजि नं१७६/२०२५ बी.एन.एस २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असतांना कोतवाली गुन्हे शोध पथकाने सदर घटनेचे तांत्रिक विश्लेषन करुन सदरची आम्लेट पावगाडी आरोपी नामे- १.सागर दिनकर बोठे रा.माणिक ओझर ता. अकोले जि.अहिल्यानगर हल्ली रा.केदार वस्ती सोलापुर रोड अहिल्यानगर २.निशांत बाळासाहेब पाखरे रा.अंबरनाथ, कल्याण हल्ली रा.केदार वस्ती सोलापुर रोड अहिल्यानगर यांनीच चोरून नेलेबाबत खात्री झाल्याने यां आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेवुन त्यांचेकडे सदर चोरीचे आम्लेट पावगाडी बाबत विचारपुस करता त्यांनी प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्यांचे कडुन आम्लेट-पाव हातगाडी हस्तगत करण्यात आली आहे.तरी सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ.योगेश कवाष्टे हे करत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती,कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. योगीता कोकाटे,पोहेकाँ योगेश भिंगारदिवे,सलिम शेख,योगेश कवाष्टे,मपोहेकॉ/रोहिणी दंरदले, पोकाँ.अमोल गाढे,अतुल काजळे,दक्षिण मोबाईल सेलचे पोकाँ.राहुल गुंडु यांनी केली आहे.