पारनेर (प्रतिनिधी):-आज 8 मार्च जागतिक महिला दिन, यानिमित्ताने जगभरात या कार्यक्रमाचे आयोजन करून जगभरात महिला दिन साजरा होत असतो.पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर महाविद्यालय व वासुंदे येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे व महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली राष्ट्रीय निरीक्षक श्रीमती जयश्रीताई घावटे यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला.

यावेळी टाकळी ढोकेश्वर विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुजित झावरे पाटील म्हणाले की,आज महिला प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहेत. शिक्षण असो, विज्ञान असो, राजकारण असो की क्रीडा असो, उद्योग-व्यवसाय असो, उद्योजकता असो, सर्वत्र महिला आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. आपण महिलांचा आदर केला पाहिजे आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी दिली पाहिजे.या महिला दिनी आपण महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्याची आणि समाजात महिलांप्रती समानतेची भावना पसरवण्याची शपथ घेतली पाहिजे.
तसेच सामाजिक कार्यकर्त्या तसेच महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली राष्ट्रीय निरीक्षक श्रीमती जयश्रीताई घावटे म्हणाल्या की,महिला या केवळ घरापुरत्या मर्यादित नसून त्या शिक्षिका,डॉक्टर,शास्त्रज्ञ, नेते आणि उद्योजकही आहेत. त्यांच्या क्षमता समजून घेऊन त्यांना साथ दिली पाहिजे कारण त्यांच्याशिवाय समाज अपूर्ण आहे.महिला सक्षमीकरण ही प्रगतीशील समाजाची ओळख आहे.
यावेळी टाकळी ढोकेश्वर विद्यालयात प्रमुख पाहुण्या म्हणून जयश्रीताई घावटे/ठुबे होत्या.अध्यक्ष डॉ.ऋतुजा खिलारी/म्हस्के,विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.खिलारी बी.एन, ज्येष्ठ शिक्षक व कला विभाग समन्वयक श्री.सोबले सर,ज्येष्ठ शिक्षक श्री वागस्कर एम.के. सर,श्रीमती.खिलारी एन.डी. श्रीमती वाळुंज एस.यु.,श्रीमती गायखे व्हि.डी.,श्रीमती.जाधव.के ई.,श्रीमती.रोहोकले एस. आर,श्रीमती.ठाणगे.एस.आर, श्रीमती.डवणे.पी.ए.श्रीमती मस्के ए.ए ,कु.कांबळे.अनुष्का श्रीमती ढोकळे,तसेच वासुंदे गावात झालेल्या कार्यक्रमात माजी जिल्हापरिषद सदस्य सुजित झावरे पाटील यांच्यासह श्रीमती जयश्रीताई घावटे व गावातील सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
