अहिल्यानगर (प्रतिनिधी):- राज्यात 1 एप्रिल पासून रेडीरेकनरच्या दरात बदल केले जातात.त्यामुळे मार्च महिन्यात खरेदी विक्रीचे व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते.
त्यामुळे दस्त कार्यालयामधील भार लक्षात घेता 1 तें 31 मार्च दरम्यान राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. याबाबतचे नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी परिपत्रक जारी केले आहे.