पुणे (प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी नवीनच ULTI-Mate अँप तयार करण्यात आला आहे.याचा विद्यार्थ्यांना नक्कीच भविष्यात फायदा होणार आहे.या ॲप सारखा इतर कोणताही ॲप नाही ULTI-Mate App याची खात्री आहे की हे ॲप सर्व पालकांना आणि मुलांना आवडेल,त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण नक्कीच विकास होईल.
सध्या हे app पूर्णपणे मोफत आहे.त्यासाठी शाळांनी व पालकांनी हे अँप डाउनलोड करून,त्यानुसार विद्यार्थ्यांची शिकवण घेतली तर त्यांचा बौद्धिक व शारीरिक आणि मानसिक विकास होण्यास मोठी मदत होईल.ह्यामध्ये हस्तकलेने करता येणाऱ्या कार्यपद्धती, विविध श्लोक आहेत तसेच विविध खेळणी वस्तू जोडून बुद्धी विकास,वाचनाची सवय वाढविण्यासाठी मार्गदर्शन, विविध गोष्टींचे श्रवण,विविध कार्यपद्धतीमध्ये भाग घेऊन नकारात्मकता दूर करून सकारात्मक दृष्टिकोनातून खेळ कला अभ्यास यात यश कसे मिळवावे याचे मार्गदर्शन,तसेच विविध प्रकारचे व्यायाम ( मुद्रा) करून स्मरणशक्ती कशी वाढवायची,व्यक्तिमत्व विकास, 21 व्या शतकातील जीवन कौशल्य ( आर्थिक आणि डिजिटल साक्षरता,उद्योजकता, डिझाइन थिंकिंग ) आणि चारित्र्य विकास याचे मार्गदर्शन आहे.थोडक्यात विद्यार्थी जीवनात अतिशय क्रांतिकारी बदल घडविणाऱ्या विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी हे अँप अतिशय उपयुक्त आहे.
नवीन पिढीसमोर खूप वेगळी आव्हान आहे.या ॲपद्वारे पालकांसाठी कार्यशाळा ही आहेत,पालकांसाठी सुद्धा विशिष्ट फीचर्स आहेत ज्याद्वारे अनवधानाने होणाऱ्या सामान्य चुका टाळता येतील आणि नवीन पिढीसाठी सक्षम पालकत्व करता येईल.पालकत्वाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मार्गदर्शन करणारा हा ULTI-MATE प्लॅटफॉर्म. यासाठी पुणे येथील आयटी प्रोफेशनल स्मिता कुलकर्णी यां शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधणार आहेत.