संगमनेर प्रतिनिधी (दत्तात्रय घोलप ):-संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनी आज महालक्ष्मी मंदिर येथे भेट देत 51 तोळे सोने व 2 किलो चांदी झालेल्या चोरीच्या घटनेचा आढावा घेत पोलिसांना लवकरात लवकर अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याच्या सुचना केल्या आहेत.
संगमनेर तालुक्याबरोबरच महाराष्ट्रातील भावीक भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून या देवस्थानकडे प्रामुख्याने बघितले जाते सदर घटने बाबत वरिष्ठांशी बोलणे झाले आहे.लवकर लक्ष्मी मंदिर चोरीच्या घटनेचा तपास केला जाईल अन्यथा हा प्रश्न विधिमंडळात घेऊ असेही आश्वासन आमदार अमोल खताळ यांनी ग्रामस्थांना दिले आहे.