अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे दिवसा घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून आरोपी कडून 1 लाख 29,000/- रू किं.चा मुद्देमाल जप्त केला आहे.बातमीची हकिगत अशी घटनेतील फिर्यादी योगेश सुरेश भोगे (रा.खरवंडी, ता.नेवासा) यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात चोरटयांनी तोडून घरातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम घरफोडी चोरी करून चोरून नेले.याबाबत शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.34/2025 बीएनएस कलम 331 (3), 305 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदरील घरफोडीच्या गुन्हयातील आरोपींचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा रोहित नादर चव्हाण (रा.चिचोंडी पाटील,ता.अहिल्यानगर) याने त्याचे साथीदारासह केल्याची माहिती प्राप्त झाली.पथकाने 1) रोहित नादर चव्हाण, वय 27, रा.चिचोंडी पाटील, ता.अहिल्यानगर व त्याचा साथीदार 2)करण सिरसाठ भोसले,वय 28, रा.ढोरेगाव, ता.गंगापूर,जि.छ.संभाजीनगर यांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपी रोहित नादर चव्हाण याचेकडे गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्हा केलेबाबत माहिती सांगून चोरी केलेले सोन्याचे दागीने दौलावडगाव, ता.आष्टी, जि.बीड येथील सोनारास विकल्याची माहिती सांगीतली.तपासकामी सोनाराने हजर केलेली 1,29,000/- रू किंमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,श्री. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग, श्री.दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, ज्ञानेश्वर शिंदे,संदीप दरंदले, अशोक लिपणे,सोमनाथ झांबरे, भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ,फुरकान शेख, प्रशांत राठोड,उमाकांत गावडे व महादेव भांड यांनी केलेली आहे.