अहिल्यानगर (प्रतिनिधी):- एमआयडीसी जवळील निंबळक शिवारात बायपास रस्त्यावर एका नाल्यामध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या 22 दिवसापासून शहरातून गायब झालेले उद्योजक दीपक परदेशी यांचा हा मृतदेह असण्याची चर्चा सुरू आहे.दरम्यान या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
24 फेब्रुवारी सायंकाळी घरातून बाहेर पडलेले दीपक परदेशी हे पुन्हा घरी परतले नाही याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदविण्यात आली होती.तेव्हापासून पोलीस शोध घेत होते.अखेर नम्रक्षिवारातील बायपास रस्त्यावर एका नाल्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला परंतु सदरील मृतदेह दीपक परदेशींचाच आहे असे जाहीर केलेले नाही.अधिक तपास पोलीस करीत आहे.