अहिल्यानगर (प्रतिनिधी):-बुरूडगाव रोड येथील चंगेडीया यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की, दि.22 मार्च 2025 रोजी 02.45 वा.सुमारास फिर्यादी योगेश श्रीकांत चंगेडीया, (वय 45,रा.साईनगर,बुरूडगाव रोड, अहिल्यानगर) यांचे राहते घराचे खिडकीचे शटर कटरच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला.याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 265/2025 बीएनएस कलम 309 (5) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्हयातील जबरी चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिलेले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.पथक कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत नमूद जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा सागरसिंग बलबीरसिंग जुन्नी,रा.अहिल्यानगर याने त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न केले.पथकाने निष्पन्न आरोपीचा शोध घेऊन 1)सागरसिंग बलबीरसिंग जुन्नी, वय 25, रा.संजयनगर, काटवन खंडोबा रोड, अहिल्यानगर त्यास ताब्यात घेतले.त्यास त्याचेसाथीदाराबाबत विचारपूस केली असता गुन्हयातील साथीदारांची नावे सांगीतली.तपास पथकाने इतर आरोपीतांचा अहिल्यानगर शहरामध्ये शोध घेऊन 2) गोपाल राजू नायडू, वय 34, रा.संजयनगर, काटवन खंडोबा रोड, अहिल्यानगर 3) सोनू शरद शिंदे, वय 29, रा.भोसले आखाडा, अहिल्यानगर 4) सोनूसिंग रणजितसिंग जुन्नी, वय 21 5) सतनामसिंग जीतसिंग जुन्नी, वय 23, अ.क्र.4 व 5 रा.संजयनगर, काटवन खंडोबा रोड, अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती सांगीतली.तसेच ताब्यातील आरोपीकडे त्यांनी गुन्हयात वापरलेली इको गाडीबाबत विचारपूस केली असता गुन्हयातील इको गाडी ही जाधव पेट्रोलपंप येथून चोरी केली असल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपीतांनी गुन्हा करताना वापरलेली इको गाडीबाबत सांगीतलेल्या माहितीवरून कोतवाली पोलीस स्टेशनचे अभिलेखाची पडताळणी केली असता त्याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं 258/2025 बीएनएस कलम 305 (ब) प्रमाणे वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे.ताब्यातील आरोपीतांना गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करणेबाबत कारवाई करण्यात येत आहे.
आरोपीने सांगीतलेल्या माहितीवरून कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल 02 गुन्हे जबरी चोरी व वाहन चोरीचे उघडकीस आलेले आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक व श्री.अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई.तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे,गणेश लोंढे,शाहीद शेख,फुरकान शेख,रविंद्र घुंगासे, अमृत आढाव,मयूर गायकवाड, जालींदर माने,विशाल तनपुरे, किशोर शिरसाठ,मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड यांनी केलेली आहे.