अकलूज (प्रतिनिधी):-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनाचे फ्लेक्स बोर्ड 15 तें 20 दिवस आधीच झळकू लागले आहे.
अकलूज शहरात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुका अध्यक्षा स्वातीताई धाईंजे,अकलूज कार्याध्यक्षा पुष्पाताई भडांगे व सर्व महिलांनी मिळून चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिवादनाचा भला मोठा फ्लेक्स बोर्ड उभारला आहे हा बोर्ड येथून जाणाऱ्या येणाऱ्यांच लक्ष वेधत आहे.यावेळी स्वातीताई धाईंजे यांनी अवाहन केले कीं,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य कुण्या एका जाती पुरते नव्हते तर या देशातील वंचित शोषित घटक आहे त्यांच्यासाठी व या देशात राहणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांसाठीच त्यांचे कार्य प्रेरणादायी होते.त्यामुळे येणाऱ्या 14 एप्रिल रोजी महामानवाच्या होणाऱ्या जयंतीला मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन केले.