अहिल्यानगर (प्रतिनिधी):- आगामी सण उत्सव शांततेत पार पाडावीत याकरिता सिध्दार्थनगर परिसरात तसेच शहरात दहशत निर्माण करणारा विजय राजु पठारे याच्यावर अखेर स्थानबद्ध ची कारवाई करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनने MPDA अंतर्गत प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावावर दि.25 मार्च 2025 रोजी जिल्हा दंडाधिकारी पंकज आशिया यांनी आदेश पारित केला.नमूद आदेश प्राप्त होताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोनि.आनंद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील,पोलीस अंमलदार योगेश चव्हाण,भानुदास खेडकर,सुनील चव्हाण,विनोद गिरी,सतीश त्रिभुवन,सुजय हिवाळे यांच्या पथकाने पठारेस ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे पाठवले.