अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतर जिल्हयांत वाहन चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद करून 3 आरोपी कडून चोरीच्या 10 वाहनासह तब्बल 25 लाख 40,000/- रू.किं.मुद्देमाल हस्तगत केला आहे.या टोळी कडून अहिल्यानगर,छ.संभाजीनगर, नाशिक,बुलढाणा येथील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.दि.19 एप्रिल रोजी पथक अहिल्यानगर जिल्हयातील वाहन चोरीच्या गुन्हयातील आरोपींची माहिती काढत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,रेकॉर्डवरील आरोपी नामे समाधान देविदास राठोड (रा.बोलकी कोपरगाव, ता.कोपरगाव,जि.अहिल्यानगर) हा त्याचे साथीदारासह वाहन चोरीचे गुन्हे करत असून चोरीचे वाहन व मोटार सायकल विक्रीसाठी एमआयडीसी परिसर,अहिल्यानगर येथे येणार आहेत.
मिळालेल्या माहितीवरून पथकाने एमआयडीसी बायपास परिसर,अहिल्यानगर येथे सापळा रचुन आरोपींचा शोध घेत असताना काही संशयीत इसम पांढरे रंगाची इरटिगा गाडी व मोटार सायकल असे थांबलेले दिसुन आले.पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पंचासमक्ष संशयीत इसमांना ताब्यात घेत असताना दोन इसम पळून गेले.पथकाने घटना ठिकाणावरून समाधान देविदास राठोड,वय 25, रा.बोलकी कोपरगाव, ता.कोपरगाव हल्ली रा.बोल्हेगाव फाटा, अहिल्यानगर 2) दादासाहेब दिलीप बावचे, वय 28, रा.सावळीविहीर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर 3) बाबा उर्फ आकाश रमेश बर्फे, वय 24, रा.तिनचारी, कोकमठाण,ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडे पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 4)सोमा उर्फ वैभव बाबासाहेब सुरवडे, रा.परफेक्ट टायर शोरूममागे, बोल्हेगाव फाटा, अहिल्यानगर (फरार) 5)रोहन अनिल अभंग,रा.देवाचा मळा, संगमनेर, जि.अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगीतले.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडे त्यांचे ताब्यातील मोटार सायकल व इरटिगा क्रमांक एमएच-04-जीएन-5777 बाबत विचारपूस केली असता आरोपी दादासाहेब दिलीप बावचे याने इरटिगा गाडी माझे मालकीचे असून तिचा वापर आम्ही कोल्हार येथे मोटार सायकल चोरी करताना केला असल्याची माहिती सांगीतली.तसेच आरोपीतांनी आणखी काही वाहने चोरी केलेबाबत विचारपुस केली असता त्यांनी चोरी केलेले दोन ट्रॅक्टर, दोन ऍ़क्टीवा व एक पल्सर असे वाहने एमआयडीसी बायपास रोडलगत ठेवलेल्या आहेत अशी माहिती सांगीतली.त्यावरून पथकाने पंचासमक्ष आरोपीतांकडून 25,40,000/- रूपये किंमत त्यात 1 मारूती सुझुकी कंपनीची इरटिगा,1 होंडा कंपनीची युनिकॉर्न,2 इनफिल्ड कंपनीची बुलेट, 3 होंडा कंपनीची ऍ़क्टीवा,1 जॉन डियर कंपनीचा ट्रॅक्टर,1 स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर,1 पल्सर मोटार सायकल असे एकुण 10 वाहने हस्तगत केले आहे.
ताब्यातील आरोपीतांना मुद्देमालासह लोणी पोलीस स्टेशन गुरनं 135/2025 बीएनएस 303 (2) या गुन्हयाचे तपासकामी लोणी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन, गुन्हयाचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे,अतुल लोटके,गणेश धोत्रे,शाहीद शेख, रणजीत जाधव,आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ,चंद्रकांत कुसळकर यांनी केलेली आहे.