अहिल्यानगर (प्रतिनिधी):- सिव्हिल हॉस्पिटलच्या पोर्चमध्ये दि.20 एप्रिल रोजी दोन अनोळखी इसमानी एका अनोळखी इसमास टाकून निघून गेले होते.त्यास दि.20 मार्च रोजी डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले होते.
तरी अकस्मात बेवारस मृत्यू पावलेल्या इसमाच्या नातेवाईकांचा वारसांचा शोध होण्यासाठी किंवा कुणाला याबाबत माहिती असल्यास तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल व्ही.सी. गंगावणे यांच्याशी संपर्क करणे असे आवाहन तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक-9552521584/0241-2416118