अहिल्यानगर (प्रतिनिधी):- घरफोडी करणाऱ्या विधीसंघर्षीत बालकांकडून चोरी केलेले 3 लाख 92 हजार रू.किमतीचे 97 ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात तोफखाना पोलिसांना मोठे यश आले आहे. घटनेतील फिर्यादी अजय हर्षकांत सासवडकर हे त्यांच्या वडिलांच्या औषधोपचार कामी राहत्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले व पुन्हा दुपारी घरी आले असता घराला लावलेले कुलूप अर्धवट तुटलेले दिसले.त्यांनी घरामध्ये जाऊन पाहिले असता यांना सोन्या-चांदीचे दागिने मिळून आले नाही. त्यांनी घरफोडी झाल्याबाबत तो खाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने तपास करत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विधी संघर्षित बालकांनी चोरी केलेली असल्याचे समजले.विधी संघर्षित बालकांच्या ताब्यातून 97 ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अमोल भारती,तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट,सुनील चव्हाण, भानुदास खेडकर,योगेश चव्हाण, अहमद इनामदार,वसीम खान, पठाण,सुरज वाबळे,सुधीर खाडे, सुमित गवळी,सुजय हिवाळे, सतीश त्रिभुवन,बाळासाहेब भापसे,सतीश भवर,महेश पाखरे,सागर साबळे यांनी केली आहे.
