अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगरसह इतर जिल्हयांत मोटारसायकल चोरी करणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत 2 आरोपीकडून चोरीच्या तब्बल 15 मोटार सायकलसह 14 लाख 20,000 /- रू.किं.मुद्देमाल जप्त केला आहे.अहिल्यानगर जिल्हयातील पोलीस स्टेशनला मोठया प्रमाणावर मोटार सायकल चोरीचे गुन्हे ना उघड असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर यांना नाउघड मोटार सायकल चोरी गुन्हयांचा समांतर तपास करून, गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अंमलदार अहिल्यानगर जिल्हयातील मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास करत असताना,पथकास गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की,रेकॉर्डवरील आरोपी नामे धनंजय अविनाश कुंदे, रा.एकरूखे,ता.राहाता, जि.अहिल्यानगर हा त्याचे साथीदारासह विना क्रमांकाच्या पल्सर व टीव्हीएस स्टार सिटी मोटार सायकलवर चोरीच्या मोटार सायकल विक्रीसाठी अस्तगाव फाटा,ता.राहाता येथे येणार आहेत.
मिळालेल्या माहितीवरून पथकाने नगर ते मनमाड महामार्गावरील अस्तगाव फाटा,ता.राहाता येथे सापळा रचुन संशयीतांचा शोध घेत असताना चार इसम हे पल्सर व टीव्हीएस स्टार सिटी मोटार सायकलवरून अस्तगाव फाटा येथे आले.पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे संशयीत इसमाकडे जात असताना ते पळून जाऊ लागले.त्यावेळी पथकाने त्यांचा पाठलाग करून दोन इसमांना ताब्यात घेतले व दोन इसम पळून गेले.पथकाने पंचासमक्ष 1) धनंजय अविनाश कुंदे, वय 24, रा.एकरूखे, ता.राहाता, जि.अहिल्यानगर 2) देवेंद्र राममिलन गौतम,वय 26, रा.अरगुपूरकला,ता.सायगंज, जि.जौनपूर,उत्तरप्रदेश हल्ली रा.एकरूखे,ता.राहाता, जि.अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले.पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडे पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 3) अमोल अविनाश कुंदे, रा.एकरूखे, ता.राहाता, जि.अहिल्यानगर (फरार) 4) गणेश भिकनाथ तेलोरे, रा.गणेशनगर, वाकडी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगीतले.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीतांना त्यांचे ताब्यातील पल्सर व टीव्हीएस स्टार सिटी मोटार सायकलबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या मोटार सायकल या कोल्हार बुद्रुक, ता.राहाता येथून त्यांचे फरार साथीदारासोबत चोरी करून आणलेबाबत सांगीतले.तसेच ताब्यातील आरोपीकडे त्यांनी इतर कोठे गुन्हे केलेबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्याचे फरार साथीदारासह अहिल्यानगर, नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथून विविध ठिकाणावरून मोटार सायकल चोरी केल्याची माहिती सांगीतली.
आरोपीकडे इतर चोरी केलेल्या मोटार सायकलबाबत विचारपूस करता धनंजय अविनाश कुंदे याने इतर चोरी केलेल्या मोटार सायकल या श्री.साईबाबा विदयालय शिर्डी येथील काटवनामध्ये ठेवल्या असल्याची माहिती सांगीतली.पथकाने पंचासमक्ष आरोपीतांच्या ताब्यातील व शिर्डी येथील काटवनातील 14,20,000/- रूपये किंमतीच्या एकुण 15 मोटार सायकल जप्त केल्या.ताब्यातील आरोपीतांना मुद्देमालासह लोणी पोलीस स्टेशन गुरनं 168/2025 बीएनएस 303 (2) या गुन्हयाचे तपासकामी लोणी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन, गुन्हयाचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी,गणेश भिंगारदे,अरूण गांगुर्डे,फुरकान शेख,सागर ससाणे,रोहित येमुल,अमृत आढाव,सुनिल मालणकर, भगवान थोरात,मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे यांनी केलेली आहे.
