प्रतिनिधी:-मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघाचा ४६ वा वर्धापनदिन व निर्धार वार्षिक विशेषांक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन बुधवार दि.२३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर (प) येथे केलेले आहे.
या होणाऱ्या कार्यक्रमाप्रसंगी ॲड.आशिष शेलार सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.अतिशय उत्साहात आनंदात संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन नंदकुमार हेगिष्टे सरचिटणीस यांनी केलेले आले आहे.या प्रसंगी मनोरंजनाचा कार्यक्रम मराठी नाटक ‘थेट तुमच्या घरातून’ याचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका संघ कार्यालयातूनच मिळतील असे संघातर्फे सूचित करण्यात आले आहे.
अधिक माहिती साठी रुपेश कोलते-मो.8928225996