संगमनेर (दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरात महालक्ष्मी देवीच्या अंगावरील सोने नाणे अज्ञात चोरट्यांनी 9 मार्चच्या दरम्यान चोरून नेले असल्याची घटना घडली होती.याच अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,पी.आय.हेमंत थोरात,संगमनेरचे डी.वाय.एस.पी डॉ.कुणाल सोनवणे,तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढोमणे यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर चारच दिवसात तपास यंत्रणा सतर्क करत तात्काळ सदर घटनेचा शोध घेत चोरट्याने चोरुन नेलेले सोने,चांदी,मंगळसूत्र,मुकुट चोरट्यांकडून मुद्देमालसह हस्तगत केला होता.
लगेचच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही केले.त्यानंतर कोर्टाकडून कायदेशीररित्या हा मुद्देमाल सोडविण्यात आला.आज शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी तालुका पोलिसांनी फिर्यादी सावळेराम झुरळे यांच्या ताब्यात सदर मुदेमाल दिले आहे.पोलिसांच्या उत्तम कामगिरीबद्दल गावचे माजी प्रभारी सरपंच जनार्दन कासार,देवस्थानचे प्रमुख ह.भ.प.भाऊसाहेब महाराज झुरळे,यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले असुन कोर्टातून सोने सोडवण्यासाठी प्रथितयश वकील तथा विधीज्ञ अविनाश गोडगे यांनी मदत करत सहकार्य केलं याबद्दल काकडवाडी ग्रामस्थांकडून वकील गोडगे यांचे देखील आभार मानले आहे.याप्रसंगी ह.भ.प भाऊसाहेब महाराज झुरळे,माजी सरपंच जनार्दन कासार,पत्रकार दत्तात्रय घोलप,भगत संतोष झुरुळे,बाळासाहेब शिरसाठ,गणेश काळे,सावळेराम झूरुळे,रावसाहेब काळे,सोमनाथ ढवळे,ज्ञानेश्वर झुरळे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.