संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे येत्या दिनांक 6 मे पासुन बौध्द राष्ट्रांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे.केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे मुंबईतुन 6 मे ला 6 दिवसांच्या बौद्ध राष्ट्रांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत.
सहा दिवसांच्या या बौध्द राष्ट्रांच्या दौऱ्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे प्रथम थायलँड त्यानंतर व्हिएतनाम आणि त्यानंतर कंबोडिया या तीन बौध्द राष्ट्रांचा दौरा करणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव तथा अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख यांनी दिली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दीस्टचे ते उपाध्यक्ष आहेत.जागतिक स्तरावर बौध्दांचे नेते म्हणुन परिचीत आहेत.व्हिएतनाम येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना प्रमुख पाहुणे म्हणुन निमंत्रीत करण्यात आले आहे.व्हिएतनाम मधील “हो ची मिन्ह “येथे आंतरराष्ट्रीय बौध्द परिषदेत ते सहभागी होणार आहेत.०५ मे पासून सुरू होणाऱ्या व्हिएतनाम येथे युनायटेड नेशनच्या हेड क्वार्टर मध्ये जागतिक वेसाक दिवस निमित्त ८० देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहुन जागतिक शांतता दिवस साजरा करण्यात येणार आहे.व्हिएतनाम,थायलँड आणि कंबोडिया येथील वरिष्ठ बौध्द धम्म गुरु,बौध्द अभ्यासक विचारवंत यांची या दौऱ्यात ना.रामदास आठवले भेट घेणार आहेत.विविध विषयांवर वार्तालाप व संवाद करणार आहेत.भारतातील बौध्दधम्म चळवळ आणि आंतरराष्ट्रीय बौध्द धम्म चळवळीबाबत बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जगाला कसे मार्गदर्शक आहेत,याबाबत बौध्द राष्ट्रांमध्ये ना.रामदास आठवले माहिती देणार आहेत.