श्रीरामपूर (प्रतिनिधी):-तालुक्यातील जि.प.प्रा. शाळा नायगाव जुने या द्विशिक्षकी शाळेत नुकतेच तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांचे प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगावचे सरपंच डॉ.राजाराम राशिनकर हे होते.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे,शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे, केंद्रप्रमुख सर्वश्री अशोक विटनोर,राजू इनामदार,बाबासाहेब पिलगर,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब सरोदे,माजी व्हा.चेअरमन कैलास चिंधे,माध्यमिक सोसायटीचे संचालक साहेबराव रकटे,विकास मंडळाचे माजी खजिनदार अविनाश साठे,राज्य नेते सय्यद जब्बार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी विद्यार्थी हितासाठी शाळेत राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन शाळेची यशोगाथा सांगितली.यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीच स्पर्धा परीक्षेत अधिक चमकतात असे सांगून इंग्रजी माध्यमापेक्षाही ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून नायगाव जुने शाळेचा गौरव केला.शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे यांनी या शाळेतील शिक्षक नेहमी विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम राबवून अष्टपैलू विद्यार्थी घडवित असल्याचे गौरवोद्गार काढले.यावेळी बाळासाहेब सरोदे,कैलास चिंधे,अशोक विटनोर,सुभाष बोर्डे,राजू इनामदार,बाबासाहेब पिलगर यांनी आपल्या मनोगतातून वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल व शाळेला आय.एस.ओ मानांकन मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक संतोष वाघमोडे व शिक्षिका सुजाता सोळसे,पालक व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.वर्षभरात विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.शाळेतील उत्कृष्ट कार्य व स्नेहसंमेलनाचे उत्कृष्ट आयोजन याबद्दल दोन्ही शिक्षकांना सर्व ग्रामस्थ,शाळा व्यवस्थापन समिती यांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत केले.विद्यार्थ्यांनी गणपती वंदना,शेतकरी गीत,छावा गीत,पाणी हरवल..कोळी गीत,लावणी नृत्य, रिमिक्स गीते,कृष्ण गीत,साईबाबागीत,भीमगीत,बालगीते,खंडोबा गीत,अहिल्यादेवी व डॉ.आंबेडकर कार्याची महती सांगणारे गीत,विनोदी उखाणे,बाईपण भारी देवा अशा सर्वस्पर्शी गीतांवर लक्षवेधी व चित्तथरारक नृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली आणि अक्षरशः बक्षीसांचा पाऊस पडला.देणगी स्वरूपात १,०७,००० रुपये (एक लाख सात हजार रुपयांची) देणगी जमा झाली.छोट्याशा लोकवस्तीतील द्विशक्षिकी शाळेत लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव करत प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास पालक,ग्रामस्थ,विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश लांडे,उपाध्यक्ष अशोक वाघ,माजी अध्यक्ष जालिंदर राशिनकर,महेश राशिनकर,संतोष राशिनकर,किरणकुमार लांडे,किरण दातीर,सुनिल दातीर,रामप्रसाद दातीर,रविंद्र दरेकर,दिपक राशिनकर,शिवाजी लहारे,डॉ.संदीप लांडे,डॉ.संकल्प राशिनकर,दिगंबर लांडे,नवनाथ बाळासाहेब राशिनकर,लक्ष्मण पवार,संदिप धसाळ,यशवंत लांडे,शामसुंदर लांडे,रविंद्र लांडे,अविनाश लांडे,केशव नजन,संदिप राशिनकर,प्रविण बोर्डे,प्रमोद भवार आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास सरपंच डॉ.राजाराम राशिनकर,उपसरपंच पुष्पाताई लांडे, माजी उपसरपंच मिनाताई लांडे,संपतनाना लांडे,चंद्रसेन लांडे, रामचंद्र लांडे,मुख्याध्यापक लहानू लबडे,बाळासाहेब इंगळे,पोलिस पाटील राजेंद्र राशिनकर,तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल लांडे,चेअरमन सुनिल प्रकाश लांडे,सुभाष लांडे,बाजीराव भुसारी,बाबासाहेब गायकवाड,इंद्रभान गायकवाड,बलभीम लहारे,गोरक्षनाथ ढवळे,राजेंद्र बुचुडे,अरुण भारसाकळ उपस्थित होते.तसेच शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य,ग्रामपंचायत पदाधिकारी,माता भगिनी गावातील तरुण मित्र मंडळ या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सदाबहार सूत्रसंचालन अनिल ओहोळ यांनी केले.