अहिल्यानगर (प्रतिनिधी):- लोक आदालत मध्ये केसेस निघाली काढण्यात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन ने भरीव कामगिरी केली आहे.दि.10 मे 2025 रोजी जिल्हा न्यायालय येथे लोक आदालतचे आयोजन करण्यात आले होते.या लोक अदालत मध्ये भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत दाखल केसेस पैकी एकूण 56 केसेस मधील गुन्हेगारांना न्यायालयात हजर ठेऊन त्यांच्या विरुद्ध असलेल्या विविध कलमानव्ये दाखल केसेस मध्ये न्यायालयात 49500 रू.असा दंड भरून केसेस निकाली काढण्यात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याने भरीव कामगिरी केली आहे.
सदरची हि कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर,पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे,पोलीस अंमलदार संजय पठारे,दीपक शिंदे,रवींद्र टकले,सतीश थोरात,रमेश कुलंगे,बबन बेरड,बाप्पू उंडे,कावेरी वखारे यांनी केली.