अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गुन्हे करण्याचे उद्देशाने विनापरवाना स्वतःच्या राहत्या घरात लपवुन ठेवलेले प्राणघातक अग्निशस्त्र जप्त करण्यात कोतवाली पोलीसांना यश आले आहे. दि.११ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० वा.सुमारास कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,जामा मज्जिद समोर,जुनी कोर्ट गल्ली, अहिल्यानगर येथे इसम नामे नदिम गॅसउद्दीन शेख याने त्याचे राहते घरात अग्निशन लपवून ठेवले आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक श्री. प्रताप दराडे यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड व पोलीस स्टाफ पंचासह खाजगी वाहनाने नमुद बातमीचे ठिकाणी इसम नामे- नदिम गॅसउद्दीन शेख याचे राहते घरासमोर उभे राहुन पोउनि/सेदवाड यांनी त्यांचे घराचा दरवाजा वाजविला.
त्यावेळी सदर घरातील एका महिलेने दरवाजा उघडला असता त्यांना पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांनी त्यांची ओळख सांगुन पंच व पोलीस स्टाफची ओळख करुन देवुन त्यांना कळविले की,आम्हास गोपनीय बातमी मिळाली आहे की,या घरात इसम नामे नदिम गॅसउद्दीन शेख याने अग्निशस्त्र त्याचे राहते घरात कोठेतरी लपवून ठेवलेले आहेत.तरी त्यांना घरझडतीचा उद्देश समजावुन सांगुन घरातील महिला व बालकास सुरक्षित ठिकाणी जाणेकरीता सांगितले. त्यानंतर घरझडती घेत असतांना पोलीस स्टाफ व पंच अशांना हॉलमधील जिन्याने पहिल्या मजल्यावर गेल्यावर पहिल्या मजल्यावरील नदिम गौसउद्दीन शेख याचे खोलीत जावुन झडती घेत असतांना सदर खोलीतील कपाटामध्ये ४०,०००/- रु. कि.ची एक स्टील धातुची गावठी बनावटीचे अग्निशस्त्र त्याचे पिस्टल ग्रिपवर दोन्ही बाजुने खरबडीत प्लास्टीक आवरण असलेले आवरणाचा रंग चॉकलेटी असुन त्यात एक स्टीलची मॅग्झीन असे जु. वा. किं. अं.२) ४००/- रु.कि.चे दोन लहान आकाराचे जिवंत काडतुसे त्यावर पिवळे धातुचे आवरण असलेले काडतुसाचे वरील भागावर गोल आवरण व बुडाशी गोल चकती असलेले किंमत अंदाजे. असा एकुण – ४०,४०० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर मुद्देमाल पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांनी पंचासमक्ष जागीच जप्त केला आहे.
सदरचा जप्त मुद्देमाल पुढील कारवाई करणेकरीता कोतवाली पोलीस स्टेशनला आणलेला असुन पोकॉ.सतिष शिंदे यांचे फिर्यादीवरुन आरोपी नामे- नदिम गौसउद्दीन शेख, रा. जामा मज्जिद समोर, जुनी कोर्ट गल्ली,अहिल्यानगर याचेविरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन, अहिल्यानगर गु.र.नं. /२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम १९४९ चे कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड हे करित आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे, पो.स.ई. कृष्णकुमार सेदवाड, सफौ.संभाजी कोतकर,पोहेकॉ. योगेश भिंगारदिवे,सलीम शेख, म.पो.कॉ.प्रतिभा नागरे,पो.कॉ. सतिष शिंदे,विजय गावडे,अतुल काजळे,महेश पवार,अमोल गाडे,तेहसीन शेख यांनी केली आहे.