अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पाईपलाईन रोड येथील यशोदानगर बाजार तळावर बिंगो जुगार सुरू असून हा बिंगो जुगार राहुल इंगळे नामक इसम चालवत आहे अशी माहिती नगर शहराचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकाला त्या ठिकाणी छापा टाकण्याचा आदेश दिला त्यानुसार पोसई.दत्तात्रय दगडू शिंदे,पोना.हेमंत खंडागळे,पोलीस अंमलदार सागर राजेंद्र द्वारके,पोहेकॉ.महेश दौलत मगर यांच्या पथकाने यशोदानगर येथील बाजार तळावर जाऊन छापा टाकला असता एका पत्र्याच्या शेडमध्ये राहुल इंगळे हा लोकांना प्रेरित करून एलसीडी स्क्रिनवर असलेल्या नंबरवर पैसे लावुन बिंगो नावाचा हार-जितीचा जुगार खेळवत होता.त्या ठिकाणी बिंगो नावाचा जुगार सुरू असल्याची खात्री पटताच पोलिसांनी त्या ठिकाणी बिंगो जुगार चालवत असलेल्या राहुल इंगळे,किरण एकनाथ शिदोरे यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी या छाप्यात बिंगो नावाच्या जुगाराची साधने व रोख रक्कम,एलसीडी, सिपीओ, माऊस,किबोर्ड,रिमोट व ०१ ते १० आकडे असलेला रेक्झिनचे कापड रोख रक्कम असा 28 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दोन्ही आरोपींना तोफखाना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.दोन्ही आरोपीं विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.