अहिल्यानगर (प्रतिनिधी):-विक्रीस बंदी असलेल्या गांजासह दोन आरोपींना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे.संभाजी छगन गर्जे, विजय अनिल साळवे असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून तब्बल एक लाख दहा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बेलेश्वर चौक येथील मोकळ्या पटांगणात काही इसम गांजा विक्री व खरेदी करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांना मिळाली या माहितीच्या आधारे बेलेश्वर पटागणांत सापळा लावून दोन आरोपींना ताब्यात घेत अटक केली.ताब्यात घेतलेल्या आरोपींची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे ०९.५५० कि.ग्रॅ वजनाचा गांजा आढळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार रविंद्र टकले, दिपक शिंदे, बापुसाहेब म्हस्के, इसराईल पठाण, समीर शेख, प्रमोद लहारे , दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु, तृप्ती काबंळे, रेखा पुंड यांनी केली आहे.