अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्हयातील अवैध दारू विक्रीच्या 18 ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून नेवासा,कर्जत,शिर्डी येथील कारवाईत 53,020/-रू. किं.मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

नमूद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार विश्वास बेरड,हृदय घोडके,गणेश लोंढे,रोहित मिसाळ,विशाल तनपुरे,अरूण मोरे,संदीप दरंदले,बाळासाहेब नागरगोजे,जालींदर माने,अशोक लिपणे,प्रमोद जाधव,उमाकांत गावडे,सोमनाथ झांबरे,रणजीत जाधव,रमीजराजा आत्तार, सुनिल मालणकर व भगवान थोरात अशांचे 03 पथक तयार करून कर्जत,नेवासा व शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले.पथकांनी कर्जत, नेवासा व शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्री करणाऱ्यांची माहिती घेऊन छापे टाकुन कारवाई केली.
पथकाने केलेल्या कारवाईमध्ये 18 गुन्हे दाखल करून त्यामध्ये 53,020/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.