मोहरम काळात शहरात प्रवेश बंदी..अहिल्यानगरमधून ४३९ जण हद्दपार..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मोहरम सुरळीत पार पाडण्याच्या उपाययोजनेचा भाग म्हणून पोलिसांनी ४३९ जणांना अहिल्यानगर शहरातून हद्दपार केले आहे.मोहरम काळात त्यांना शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.अहिल्यानगर शहराचे डीवायएसपी अमोल भारती यांनी माहिती दिली की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ (२) कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील १०३,तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील १६२ तर भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील १७४ अशा एकूण ४३९ जणांना शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
शनिवारी ५ जुलैला रात्री कत्तलची रात्र मिरवणुक तर ६ रविवारी ६ जुलै दुपारी ताबूत विसर्जन मिरवणूक निघणार आहे.तसेच रविवारी आषाढी एकादशी असल्याने या दिवशी विठ्ठल मंदिरामध्ये उत्सव आणि भाविकांची गर्दीही होणार आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी कठोर पावले उचलली आहे.