अवैध गोमांस विक्रेत्यावर तोफखाना पोलिसांनी कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अवैध गोमांस विक्रेत्यावर तोफखाना पोलिसांनी कारवाई करत 40 किलो गोमांससह ९२००/-रुपये कि.चे.साहित्य जप्त केले आहे.दि.०४ जुलै २०२५ रोजी कोठला येथील झोपडपटटी,घासगल्ली,येथे इरफान राजु शेख हा इसम एका पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस स्वतःच्या कब्जात बाळगुन त्याची विक्री करत आहे अशी माहिती तोफखाना पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांना मिळाली तात्काळ पोनि. कोकरे यांनी पोलीस पथकाला सुचना करून कारवाई करण्यास सांगितले.
दिलेल्या सूचनेनुसार पथकाने कारवाई करुन इसम नामे इरफान राजु शेख वय २६ वर्ष रा.घासगल्ली कोठला ता. जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेवुन त्याचे कब्जातुन ८०००/- रु.कि.चे ४० किलो गोमांस, १०००/-रु.कि.चा लोखंडी वजनी काटा, २००/-रु.कि.चा एक लोखंडी सत्तुर असा एकुण ९२००/-रुपयेचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत पोकॉ/२४८६ सुजय विल्यम हिवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६९७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१,२२३ सह महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५ (ब) (क),९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ.जालींदर आव्हाड तोफखाना पोलीस स्टेशन हे करत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगीरी ही पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी न.श.वि.श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांच्या सुचने प्रमाणे,सपोनि/पुनम श्रीवास्तव,पोसई/परशुराम दळवी,पोहेकॉ/अब्दुल ईनामदार, सुजय हिवाळे,पोकॉ/सुमित गवळी,बाळासाहेब भापसे, सतिष भवर,भागवत बांगर, अविनाश बर्डे,रोहकले यांनी केली आहे.