नगर शहर विधानसभेचे आमदार संग्राम जगताप यांना ‘दो दिन मे खत्म करुंगा’ म्हणणारा अखेर गजाआड एलसीबी टीमची कामगिरी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप, अहिल्यानगर यांच्या नावाने जगताप यांच्या स्वीय सहाय्यकाच्या व्हाट्सअपला मेसेज करून धमकी दिल्या प्रकरणातील एक आरोपी तेलंगणा राज्यातुन जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.02 जुलै 2025 रोजी पिडीत फिर्यादी हिचे इन्स्टाग्राफ अकांऊटवर अनोळखी व्यक्तीचे अकाऊंटवरून दोन अश्लील मॅसेज पाठविल्याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुरनं 612/2025 बीएनएस 2023 चे कलम 78, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67, 67(अ) व पोक्सो ऍ़क्ट कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेचदि.02 जुलै 2025 रोजी तक्रारदार सुहास साहेबराव शिरसाठ,रा.बुरूडगाव रोड, अहिल्यानगर यांचे मोबाईलवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून संग्राम को दोन दिन के अंदर खत्म करूंगा असा आलेल्या मॅसेजवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा रजिस्टर नं.796/2025 बीएनएस कलम 351 (4) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. कोतवाली पोलीस स्टेशन अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या दोन धमकी प्रकरणांची प्राथमिक माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन गुन्हयाचा तपास करणेबाबत आदेश दिले.त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार फुरकान शेख,रविंद्र घुंगासे,सागर ससाणे,अमृत आढाव अशांचे पथक नेमुन गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा हा अनिस महंमद हनिफ शेख,रा.चकलंबा,ता.गेवराई, जि.बीड याने केला असल्याचे तपासात निष्पन्न केले.तसेच तांत्रीक माहितीच्या आधारे आरोपी हा सध्या तेलंगणा राज्यात असल्याची माहिती प्राप्त झाली.मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे धग्गी, ता.जि.निजामाबाद,तेलंगणा राज्य येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन अनिस महंमद हनिफ शेख, वय 32, मुळ रा.रूस्लाबाद, पो.चकलंबा, ता.गेवराई, जि.बीड हल्ली रा.नारेगाव, ता.जि.छत्रपती संभाजीनगर यास ताब्यात घेतले.पथकाने ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने नमूद गुन्हा केल्याची माहिती सांगीतली.तसेच दि.02 जुलै 2025 रोजी त्याने स्वत:चे मोबाईलवरून दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर “Sangram ko do din ke andar khatm karunga” असा टेक्स मॅसेज केल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपीस कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं 612/2025 या गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहेत.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.