कोतवाली..नगर तालुका..एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील दुकाने फोडणाऱ्या चोरट्यांना एलसीबी चा दणका
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कोतवाली,नगर तालुका व एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील व्यापाऱ्यांच्या दुकानावर झालेल्या घरफोडीच्या गुन्हयांची उकल स्थानिक गुन्हे शाखेने केली असून 02 आरोपी जेरबंद करण्यात यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की,दि.01 जुलै 2025 रोजी फिर्यादी नामे संजय चुनिलाल लुनिया (वय 61,धंदा पशुखादय दुकान,रा.आनंदधाम, अहिल्यानगर) हे रात्रीच्या सुमारास त्यांचे पशुखादय दुकान बंद करून घरी केले असता अज्ञात आरोपीतांनी शटरचे कुलूप तोडून दुकानातील ड्रॉवर मधुन रोख रक्कम चोरून नेली.याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.610/2025 बीएनएस कलम 331 (4), 305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.दि.03 जुलै 2025 रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा अकबर लुकमान खान व त्याचे साथीदारांनी केला असून ते मोटार सायकलवर राधाबाई काळे महाविदयालय परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीवरून नमूद ठिकाणी सापळा रचुन संशयीत आरोपीचा शोध घेत असताना संशयीत आरोपी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत असताना एक संशयीत आरोपी पळून गेला.पथकाने घटनाठि काणावरून 1)अकबर लुकमान खान, वय 33, रा.दौलावडगाव, ता.आष्टी,जि.बीड 2)आर्यन पप्पु शेख, वय 19, रा.दौलावडगाव, ता.आष्टी,जि.बीड अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीकडे पळून गेलेल्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 3) समीर बालम शेख, रा.मुकूंदनगर,अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगीतले.
पथकाने ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी त्यांचा फरार साथीदारासह अहिल्यानगर शहरातील मार्केटयार्ड येथील पशु खादय दुकान फोडून चोरी केल्याची माहिती सांगीतली. तसेच आरोपी अकबर लुकमान खान याचेकडे त्यांनी आणखी कोठे गुन्हे केले आहेत काय याबाबत चौकशी करता त्याने त्याचे वरील साथीदारासह 4 दिवसापुर्वी साकत ता.अहिल्यानगर व मागील दोन महिन्यापुर्वी देहरे ता.अहिल्यानगर येथील मेडीकल दुकानाचे पत्रे उचकटून चोरी केल्याची माहिती सांगीतली.आरोपीने दिलेल्या माहितीवरून खालीलप्रमाणे 03 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं 610/2025 या गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहेत.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग,श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे,संदीप पवार, शाहीद शेख,मयुर गायकवाड, रविंद्र घुंगासे,फुरकान शेख, प्रशांत राठोड व महादेव भांड यांनी केलेली आहे.
Trending Topics:
Trending
- गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ नाव बदलून श्री शिवगोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ नाव देण्यात यावे समाजाची मागणी..अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीचे आ.विठ्ठलराव लंघे यांना निवेदन..
- हिवरगाव पावसामध्ये विद्यार्थ्यांचा नयनरम्य रिंगण सोहळा..देवगड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढली समतेची दिंडी
- राजमुद्रा करिअर अकादमीकडून स्नेहालयमध्ये आषाढी एकादशी निम्मित वृक्षारोपण व श्रमदान उपक्रम
- घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश..लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..18 गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगार मिलन पकडला..
- अवैध तिरट जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांचा छापा..नऊ जणांवर गुन्हा दाखल
- श्री राघवेंद्र स्वामी मंदिरात चोरी करणा-या टोळीच्या तोफखाना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- मोहरम काळात शहरात प्रवेश बंदी..अहिल्यानगरमधून ४३९ जण हद्दपार..
- नगर शहर विधानसभेचे आमदार संग्राम जगताप यांना ‘दो दिन मे खत्म करुंगा’ म्हणणारा अखेर गजाआड एलसीबी टीमची कामगिरी..