घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश..लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..18 गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगार मिलन पकडला..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून पकडलेल्या आरोपीकडून 250 ग्रॅम सोन्यासह 24,26,000/- रू किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अहिल्यानगर,सातारा, नाशिक,पुणे येथील 16 घरफोडीच्या गुन्हयांची उकल करण्यात आली आहे.बातमीची हकिगत अशी की,दि. 20/06/2025 रोजी फिर्यादी श्रीमती शालिनी बाळशीराम शेळके (वय 50,रा.बोटा, ता.संगमनेर) या त्यांचे राहते घर बंद करून बाहेरगावी गेल्या असताना अज्ञात चोरटयांनी त्यांचे राहते घराचे कुलूप तोडून घरामधून सोन्याचे दागीने चोरून नेले.याबाबत घारगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 200/2025 बीएनएस कलम 305 (अ), 351 (3), 331 (4) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्हयातील उघडकीस न आलेल्या घरफोडीच्या गुन्हयांचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचेच्या पथकास गुन्ह्याचे तपासात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घारगाव पोलीस स्टेशनला दाखल असलेला गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे मिलींद उर्फ मिलन ईश्वर भोसले रा.बेलगांव,ता. कर्जत याने त्याचे साथीदारासह केल्याची माहिती प्राप्त झाली.मिळालेल्या माहितीवरून पथकाने कर्जत तालुक्यात आरोपीतांचा शोध घेऊन 1) मिलींद उर्फ मिलन ईश्वर भोसले, वय 28, रा.बेलगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर 2)सुनिता उर्फ सुंठी देविदास काळे,वय 35, रा.नारायण आष्टा,ता.आष्टी, जि.बीड 3) एक विधीसंघर्षित बालक, वय 17, रा.बेलगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपी मिलींद ईश्वर भोसले याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस त्याने सदरचा गुन्हा त्याचे वरील साथीदारसह 4) शुभम उर्फ बंटी पप्पु काळे रा.एम.आय.डी.सी. अहिल्यानगर (फरार) 5) सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले रा. बेलगांव, ता. कर्जत (फरार), 6) संदीप ईश्वर भोसले रा. सदर (फरार), 7) कुऱ्हा ईश्वर भोसले रा. सदर (फरार) अशांनी मिळून त्यांचेकडील दोन मोटार सायकलवरून बंद घराची पाहणी करुन घरफोडीचा गुन्हा केल्याची माहिती सांगीतली.
पथकाने ताब्यातील आरोपी मिलींद ईश्वर भोसले यास विश्वासात घेऊन त्यांनी आणखी कोठे गुन्हे केले आहेत याबाबत चौकशी केली असता त्याने त्याचे वरील साथीदारासह अहिल्यानगर जिल्हयातील घारगाव, श्रीरामपूर,संगमनेर त्याच प्रमाणे पुणे,सातारा,नाशिक जिल्हयामध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगीतले.ताब्यातील आरोपी मिलींद ईश्वर भोसले याचेकडे गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने काही मुद्देमाल हा त्याची बहीण सुनिता उर्फ सुंठी देविदास काळे, रा.नारायण आष्टा,ता.आष्टी, जि.बीड व त्याची पत्नी कोमल मिलींद भोसले यांचे मार्फतीने सोनारास विकला असल्याचे व काही मुद्देमाल त्याने त्याचे नातेवाईकाचे घरामागे लपवून ठेवला असल्याची माहिती सांगीतली.पथकाने पंचासमक्ष सोनाराने हजर केलेले 4,50,000/- रू किंमतीचे 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व आरोपीने काढुन दिलेला 19,76,000/- रू किंमतीचा मुद्देमाल त्यात 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध वर्णनाचे दागीने, गुन्हयाचे वेळी वापरलेला गावठी कट्टा (अग्नीशस्त्र), 3 जिवंत काडतुस, मोटार सायकल व लोखंडी कटावणी असा एकुण 24,26,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी मिलींद उर्फ मिलन ईश्वर भोसले हा सराईत आरोपी असून त्याचे विरूध्द यापुर्वी दरोडा 03, दरोडा तयारी 02, जबरी चोरी 01, घरफोडी 10 व चोरीचे 02 असे एकुण 18 गंभीर गुन्हे दाखल आहेत.ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी घारगाव पोलीस स्टेशन गुरनं 200/2025 बीएनएस 331 (4), 351(3), 305 (अ) या गुन्हयाचे तपासकामी घारगाव पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,श्री.कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर उपविभाग, श्री.दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव,पोलीस अंमलदार गणेश धोत्रे,फुरकान शेख, भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,बाळासाहेब खेडकर, सुनील मालणकर,भगवान थोरात,प्रशांत राठोड,मेघराज कोल्हे,भगवान धुळे व भाग्यश्री भिटे यांनी केलेली आहे.