राजमुद्रा करिअर अकादमीकडून स्नेहालयमध्ये आषाढी एकादशी निम्मित वृक्षारोपण व श्रमदान उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने स्नेहालय संस्थेच्या ‘स्नेहस्पर्श’, ‘मानसग्राम’ व ‘हिम्मतग्राम’ प्रकल्पांमध्ये राजमुद्रा करिअर अकादमीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने वृक्षारोपण व श्रमदान उपक्रम राबवण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात निसर्गपूजनाने झाली.सर्वांनी निसर्ग संवर्धनाची शपथ घेतली.
विद्यार्थ्यांनी एकूण 70 झाडांचे वृक्षारोपण करत परिसरातील स्वच्छता,झाडांची मशागत,आणि स्वच्छतागृहांची सफाई अशा विविध प्रकारच्या श्रमदानात सहभाग घेतला. उपक्रमामध्ये एकूण 70 विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग होता.राजमुद्रा करिअर अकादमीच्या संचालिका नंदाताई पांडुळे** यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणेतून हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी केवळ वृक्षारोपणच केले नाही, तर **समाजाप्रती जबाबदारी स्वीकारत स्वच्छतेच्या कामांतून सामाजिक बांधिलकीची भावना**ही प्रकट केली.विशेष म्हणजे याच दिवशी **नंदाताई पांडुळे यांच्या नेहा या मुलीचा वाढदिवस स्नेहालयमध्ये साजरा** करण्यात आला.
पारंपरिक पद्धतीऐवजी **स्नेहालयमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक समरसतेचा आदर्श** निर्माण करण्यात आला.या उपक्रमात **स्नेहस्पर्श प्रकल्पप्रमुख चंद्रकांत शेंबडे, सुभाष राठोड, रवींद्र पवार, सुजाता मासुळे, हिम्मत ग्रामचे प्रकल्प समन्वयक निलेश तळेकर** आणि **मानसग्रामचे रमाकांत सर** व त्यांच्या कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.स्नेहालय संस्थेच्या वतीने चंद्रकांत शेंबडे यांनी सांगितले की**, *“अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना रुजते. शिक्षणासोबत संस्कारांची पेरणी करणे हेच आमचे ध्येय असून, अशा कृतीतूनच विद्यार्थ्यांना समाजाभिमुखता लाभते.