पवनार प्रतिनिधी (गणेश हिवरे):-संतांची पावनभुमी म्हणून वारसा लाभलेली व विदर्भाची काशी अशी ओळख निर्माण असलेल्या पवनार येथील नंदिखेडाची ओळख आहे.पश्चिमेकडून उतरवहिनी म्हणून सुद्धा याची ओळख असल्याने शिवरात्री निमित्त भाविकांसाठी मंदिर सज्ज झाले आहे.धाम नदीच्या तीरावर एकीकडे हेमाडपंथी असलेले शिवलिंगाचे प्राचीन मंदिर आहे तर दुसऱ्या तीरावर भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचे समाधिस्थान आहे,तसेच धाम नदीच्या मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीचे स्मृतीस्थान आहे त्या मुळे या गावाला विशेष महत्व प्राप्त आहे.पवनार नगरी हि प्रवरसेन राज्याची नगरी म्हणून संपूर्ण भारतात याची ख्याती आहे.याचा पहिला राजा विखाटक असून दुसरा राजा हा प्रवरसेन होता प्राचीन काळात पवनार हे गाव नसून मोठी राजधानी असल्याचं सांगण्यात येत आहे याचे क्षेत्र नागपूर भंडारा जिल्ह्यातील पवनी चंद्रपूर वणी वाशिम अकोला इथपर्यंत असून पवनार हे त्याचे केंद्रबिंदू असल्याचं बोलल जात आहे त्या काळात प्रवरसेन राजा ह्याच्या जवळ पारीस असल्याने नागरिकांकडून कर स्वरूपात लोखंड स्वीकारल्या जात असे व स्वीकारलेल्या लोखंडाचे सोन्यात रूपांतर करून प्रजेच्या हितासाठी त्याचा वापर करत असल्याचं सांगण्यात येत आहे.त्या मुळेच पवनार नगरीला सोन्याची नगरी म्हणून आजही संपूर्ण विदर्भात ओळख असून काशीचे महत्व प्राप्त झाले आहे याची नोंद आजही मध्य प्रदेशातील शासनाकडे नोंद असल्याचं सांगण्यात येत आहे.धाम नदी तीरावर होतात मोक्ष प्राप्तीचे हवन,धाम नदी हि उत्तर वहिनी असल्याने या ठिकाणी दुवरून नागरिक रक्षा विसर्जित करून धाम नदी तीरावर होम हवन करतात त्या मुळे मृत व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.घट स्थापना करून होते पूजेला सर्वात प्राचीन शिवलिंग असलेल्या ठिकाणी दरवर्षी घटस्थापना करून पूजेला सुरुवात होते त्यामुळे भाविक पहाटे पासूनच या मंदिरात रांगा लावत असतात ब्रार्शीच्या दिवशी दहीहंडी गोपाळकाला.महाप्रसाद करून याची सांगता करण्यात येते त्या निमित्याने या ठिकाणी मोठी जत्रा सुद्धा भरले जाते.प्रवरसेन राजा चालवत होता राजधानीचा कारभारवव खाटक राजा मृत झाल्यानंतर प्रवरसेन राज्याने या राजधानीचा कार्यभार हातात घेतला पवनार हे गाव नसून राजधानीचा केंद्र बिंदू होते पवनार नगरीच्या सीमा सुरक्षे साठी सभोवताल दगडाच्या मोठ मोठ्या भिंती असून दगडाचे चार दरवाजे होते त्या पैकी आजही एक दरवाजा हैयात असून लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षित धोरणामुळे मोडकळीस आला.नंदिखेडा मंदिरातील नंदिस हटविण्यासाठी जुंपली होती बारा बैलांची आगुल नंदिखेडा मंदिरात शिवलिंगा समोर बसून असलेले नंदी महाराज यांना या ठिकानवरून काढून दुसऱ्या ठिकाणी बसविण्यासाठी ग्रामस्थांकडून अथक प्रयत्न करण्यात आले या साठी नंदी महाराजांना हटविण्यासाठी बारा बैलांची आगुल लावल्या गेली परंतु नदी महाराज एक सुथ सुधा हलले नसल्याचं बुजुर्ग सांगत आहे त्या मुळे याचे आजही या मंदिराला विशेष महत्व दिल्या जाते.