प्रतिनिधी (दि.१८ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रायतेवाडी फाटा या ठिकाणी संगमनेर शहर पोलिसांनी कारमधून विक्रीसाठी नेत असलेले ५०० किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी चारचाकीसह सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.मात्र अंधाराचा फायदा घेत कार चालक पसार झाला.याबाबत संगमनेर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जनावराच्या कत्तलीस बंदी असताना देखील या आदेशाचे उल्लंघन करून नाशिक पुणे महामार्गावर गोमांसची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रायतेवाडी फाटा या ठिकाणी नाकाबंदी केली.वाहनांची तपासणी करीत असताना एका कारमध्ये पोलिसांना गोमांस आढळले.पोलिसांनी कारमधून ५०० किलो गोमांस जप्त केले.याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात गोहत्याबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
