महाशिवरात्री निमित्त युवासेनेच्या वतीने फराळ वाटप
वर्धा प्रतिनिधी(सागर झोरे):-हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण २०% राजकारण या विचाराने प्रेरित होऊन तसेच माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख मा.उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना राष्ट्रीय सचिव वरून सरदेसाई,युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश कदम,हर्षल काकडे,युवासेना विभागीय सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखेडे व युवासेना वर्धा-अमरावती लोकसभा विस्तारक राजसाहेब दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्री निमित्त आर्वी शहर येथे फराळ वाटपाचे उपक्रम युवासेना जिल्हा प्रमुख सूर्या हिरेखन यांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी देवा दि देव भोलेनाथाच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून फराळ वाटपाला सुरवात करण्यात आली.यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फराळाचा आनंद घेतला यावेळी दादाराव केझरकर,लखन प्रधान,संकेत कुत्तरमारे,अस्लम भाई,हरीश मराठे,विशाल राऊत,प्रशांत नाकतोडे,सागर नाकतोडे, नितीन गावंडे,दानिश खान, लोकेश गावंडे,संतोष प्रधान व आदी युवासैनीक पदाधिकारी उपस्थित होते.