अंगणवाडी सेविका आरोग्य विषयक जनजागृतीच्या मुख्य आधारस्तंभ-उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे
पवनार वार्ताहर(गणेश हिवरे):-पवनार इथे रेडिओ 90.8 वर्धातर्फे पवनार मधील अंगणवाडी सेविकांचा सत्कार सोहळा पार पडला या वेळी राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.केवळ मातेच्या गर्भधारणे पासूनच नव्हे तर किशोरीच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीतून त्यांना एक समृद्ध आई बनविण्या हेतू महत्वाचे मार्गदर्शन करणारी आणि तिच्या बाळाला या देशाचा सुदृढ नागरिक घडवायला बालपणीच योग्य शैक्षणिक संस्कार देण्यासाठी जीवाचे रान करणा-या ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांचे कार्य ते खरोखरच खूप मोलाचे आहे.अंगणवाडी सेविका या खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील आरोग्य विषयक जनजागृतीच्या चैतन्यदूत आहे असे गौरवोद्गार ऊपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुनील मेसरे यांनी काढले.रेडीओ वर्धा 90.8 एफ एम या सामुदायिक रेडिओ केंद्राच्या वतीने पवनार येथे आयोजित अंगणवाडी सेविकांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी मंचावर रोटरी क्लब गांधी सिटी वर्धा चे अध्यक्ष शैलेश सिंहल,पर्यंवेक्षीका माधुरी लोणकर तडस,पवनारच्या सरपंच शालिनीताई आदमने, बाबुरावजी बांगडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणीताई बांगडे आणि रेडिओ वर्धाचे मॅनेजिंग डायरेक्टर अजय तीगांवकर हे उपस्थित होते.जागतिक पातळीवर काम करणाऱ्या युनिसेफ या संस्थेद्वारा “आरंभ सुरवातीचे- क्षण मोलाचे” या आरोग्यविषयक महत्वपूर्ण प्रकल्पाचे साभिनय रेडिओ नाट्य रूपांतरण करण्यामध्ये सहभाग नोंदवून माता आणि बाल संगोपन या मुद्यावर आरोग्य विषयक जनजागृतीचे महत्वाचे कार्य केल्याबद्दल मनीषा अतुल डंभारे,शितल अंकुश दाते, वैष्णवी आशिष लाडे,पूजा मंगेश वानखेडे,सोनू उमेश सहारे,महानंदा हुलके,जयश्री भट,अरुणा नगराळे,रत्ना साखरकर,अनिता नगराळे, चंद्रकला भट,अलका भुरे, चैताली दारकोंडे,सपना तिमांडे,नूतन शहारे,वैशाली सोनटक्के,ज्योती फुलझेले, ज्योती वाघ आणि मीनाक्षी म्हैसकर या सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस तथा महिलांचा रेडीओ वर्धाच्या वतीने प्रमाणपत्र आणि साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी माॅ जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या सत्कार समारंभाचे अध्यक्ष शैलेश सिंहल यांच्या पुढाकाराने गावातील गर्भवती तथा स्तनदा मातांना न्यूट्रिशन कीटचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेडीओ वर्धाच्या सीईओ म॔गला तीगांवकर,साऊंड ईंजिनीअर शकेब शेख,पवनारच्या अंगणवाडी मदतनीस आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.रेडिओ वर्धा चे मॅनेजिंग डायरेक्टर अजय तिगावकर यांनी या कार्यक्रमाची भूमिका आपल्या प्रस्तावनेतून मांडली, कार्यक्रमाचे संचालन जगदीश तर आभार प्रदर्शन महानंदा हुलके यांनी केले.कार्यक्रमाला ग्रामस्थासह महीलांची यावेळी प्रामुख्याने बहुसंख्य उपस्थिती होती.