हार्मनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींचे जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत यश
अहमदनगर प्रतिनिधी(दि.१९ फेब्रुवारी):- येथील वाडियापार्क येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत वडगाव गुप्ता येथील हार्मनी इंटरनॅशनल स्कूलच्या कु.सिद्धी थोरात हिने चौदा वर्षे आतील वयोगटातील लांब उडी या प्रकारात तृतीय क्रमांक पटकवला तर कु.अर्णवी पवार हिने दहा वर्षा आतील गोळा फेक या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकवला या विद्यार्थिनींना हार्मनी इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडा प्रशिक्षक अमोल ठोंबे यांचे मार्गदर्शन लाभले.हार्मनी स्कूलचे प्राचार्य अशोक बेरड सर अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव दिनेश भालेराव,महाराष्ट्र राज्य हॉलिबॉल संघटनेचे उपाध्यक्ष व अहमदनगर जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे सचिव शैलेश गवळी तसेच भारतीय जनता पक्षाचे युवा नेते नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी यावेळी मुलींना शुभेच्छा दिल्या व त्यांचे कौतुक केले.