यशवंत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भिडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
वर्धा प्रतिनिधी(सागर झोरे):-यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सय्यद यांची उपस्थिती होती.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले या वेळेस मान्यवरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे भाषणे झाली.तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे स्फूर्तीदायक गीत गायले.यावेळी विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.