Maharashtra247

स्थानिक गुन्हे शाखा पो.नि.अनिल कटके, तोफखाना पो.नि.सौ.ज्योती गडकरी,नगर तालुका स.पो.नि.राजेंद्र सानप उत्कृष्ट कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पुरस्काराने सन्मानित                               

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.१९ फेब्रुवारी):-शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाचे व प्रशासनाचे मोठे कार्य आहे.समाजात भेडसावणाऱ्या अनेक समस्या सोडविण्याचे काम कर्तव्यदक्ष अधिकारी करीत आहेत.त्यामुळेच आपला समाज सुरक्षित आहे.शहरातील वाढती गुन्हेगारी,दरोडे,व अवैध धंदे यांवर अंकुश ठेवला आहे. जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी देशसेवेचे उत्कृष्ट कार्य करीत आहेत.समाजातील सर्वसामान्य घटकाला न्याय मिळावा.यासाठी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी गुन्हेगारी संपविण्याचे कार्य करीत आहेत.या अधिकाऱ्यांचा डोंगरे बहुउद्देशीय संस्थेने योग्य सन्मान केला आहे.असे प्रतिपादन कवियत्री गुंफाताई कोकाटे यांनी केले आहे. निमगाव वाघा येथील स्व.पै. किसनराव बहुद्देशीय संस्था,श्री नवनाथ युवा मंडळ,धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, नवनाथ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सौ.ज्योती गडकरी,नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना उत्कृष्ट कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी पुरस्कार सन्मान चिन्ह व मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी प्रसिद्ध कवयित्री गुंफाताई कोकाटे, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री मुकुल गंधे, गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव,विषय तज्ञ श्रीमती प्रियंवदा कुलकर्णी,विशेष शिक्षक लता बोरुडे,प्रति गाडगेबाबा फुलचंद नागटिळक,औरंगाबाद येथील सहाय्यक अधिव्याख्याता डॉक्टर शैलेंद्र भणगे,शिव व्याख्याते अभय जावळे, शिवशाहीर विक्रम अवचिते, मुख्याध्यापक किसन वाबळे,नगर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन साहेबराव बोडखे,डॉ.विजय जाधव,युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदीप डोंगरे, राष्ट्रीय खेळाडू प्रतिभा डोंगरे कु.प्रतिभा डोंगरे,शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त सौ. मंदाताई डोंगरे,धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या उपाध्यक्ष तथा एन आय एस प्रियंका डोंगरे- ठाणगे भागचंद जाधव,उद्योजक दिलावर शेख,अतुल फलके, शब्बीर शेख,ज्ञानदेव कापसे, चंद्रकांत पवार,निळकंठ वाघमारे, उत्तम कांडेकर,मंदा साळवे, अशोक डौले,तेजस केदारी, मुख्याध्यापक हबीब शेख,अवि साठे,अजय ठाणगे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात पै.नाना डोंगरे म्हणाले,स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गेल्या 30 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात,क्रीडा क्षेत्रात तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गुन्हा गौरव करण्यात येतो.कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी समाजात उत्कृष्ट पद्धतीने कार्य करीत आहे. त्यांच्या कार्याची समाजाने दखल घ्यावी.म्हणून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पोलीस दलातील अधिकारी अहोरात्र आता परिश्रम करून गुन्हेगारावर अंकुश ठेवत आहेत. या पुरस्काराच्या रूपाने समाजाने त्यांना सत्कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.यापुढेही चांगली कामगिरी करून समाज सुरक्षित करण्याचे कार्य त्यांच्या हाती घडो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साबळे यांनी केले तर आभार पै.संदीप डोंगरे यांनी मानले.

You cannot copy content of this page