Maharashtra247

वर्धा येथे तृतीयपंथीयांचे दोन दिवसीय शिबिर व कार्यशाळा संपन्न,तृतीयपंथीयांनी शिक्षणाकडे लक्ष देणे काळाची गरज ॲड.शिवानी सुरकार;तृतीयपंथींना मानवतावाजाची गरज शिवाजी काळे

 

वर्धा प्रतिनिधी (सागर झोरे):-नागपूर संभागीय वर्धा तसेच पाच जिल्ह्यातील तृतीयपंथीच्या विकास, संरक्षण व कल्याणाकरिता महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागातर्फे निवड करण्यात आलेल्या जगदंबा शिक्षण संस्था बुलढाणा तसेच आधार कम्युनिटी बेस ऑर्गनायझेशन वर्धा यांनी तृतीयपंथीयांच्या ओळखपत्र व नोंदणी करिता दोन दिवसीय शिबिर तथा कार्यशाळेचे आयोजन दि.१७ व १८ फेब्रुवारी २०२३ रोजी आकरे मंगल कार्यालय वर्धा येथे आयोजित केले होते.तृतीयपंथी हे सुद्धा समाजाचा अविभाज्य घटक आहे व समाजामध्ये त्यांना योग्य स्थान मिळणे आवश्यक आहे असे प्रतिपादन बुलढाणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव काळे यांनी केले.तृतीयपंथींनी शिक्षणाच्या प्रवाहात येणे ही काळाची गरज असून त्यांना समाजातील लोकांनी तिरस्कार न करता स्वीकार करावे असे मत विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील शिवानी सुरकार यांनी व्यक्त केले.वर्धा जिल्हा विधी प्राधिकरणचे सचिव श्री.विवेक देशमुख यांनी सुद्धा तृतीयपंथीयांना मार्गदर्शन करून भविष्याच्या वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा दिल्या.डॉ.योगेश देवतळे यांनी एचआयव्ही व एसटीडी या रोगांबद्दल माहिती देऊन प्रतिबंधाचे उपाय सांगितले तसेच ॲड.विवेक रामटेके,ॲड.रुबीया अब्बास बैग,ॲड. लोहवे सर,ॲड.निळकंठ हूड व ॲड.असद खान यांनी तृतीयपंथींयांचे मूलभूत अधिकार तसेच कायदेविषयक तरतुदी बद्दल अप्रतिम मार्गदर्शन केले.तृतीयपंथींना येणाऱ्या अडचणी व त्यांना होणारा मानसिक त्रास याबद्दल सुद्धा अधिवक्ता समूहाने खेद व्यक्त केला.समाजकल्याण विभाग नागपूर येथील नेवारे सर तसेच समाज कल्याण विभाग वर्धा येथील सुहास लिहीतकर व प्रेमलता बुरंगे यांनी शिबिरास पाठिंबा देऊन सहकार्य केले. घनश्याम गुंडेवार तसेच नीलिमा वाघमारे यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.या शिबिर व कार्यशाळेत नागपूर विभागीय अंतर्गत वर्धा तसेच अन्य एकूण १३५ तृतीयपंथींची नोंदणी करण्यात आली.नागपूर मधील विद्या कांबळे आचल वर्मा व विद्या कारोकार यांनी विशेष हजेरी लावून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पनाताई फुसाटे यांनी सांभाळले.आधार कम्युनिटी बेस ऑर्गनायझेशनच्या सचिव रितू जुमडे तसेच सदस्य हिना बोंबे व वैशाली उडाके यांनी सुद्धा उत्कृष्ट संभाषण देऊन तृतीयपंथीयांमध्ये जनजागृती केली.याशिवाय ऍड. प्रिया उके, ऍड.पंकज माणसादा,नेवारे सर, खुशी,मुस्कान, मेहमूदनायक, ईशा नायक, सायरा,रागिनी, पंपी, युवराज, मंगला, सुकन्या इत्यादींनी शिबिर संपन्न करण्यास योगदान दिले. वर्धा जिल्ह्यात झालेल्या या कार्यक्रमात तृतीयपंथींची उपस्थिती अगदी लक्षणीय होती.

You cannot copy content of this page